Satish Bhosale : खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल
Shirur Kasar Crime News : शिरूर कासार मारहाण प्रकरणातील सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसले याचं घर जाळल्या प्रकरणी अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसलेचं घर पेटवल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोक्याच्या कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आणि धमकी दिल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी 20 ते 25 जणांवर शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर कासार येथील मारहाण प्रकरणातील आरोपी खोक्या भोसले याचं घर काही अज्ञात इसमांनी पेटवून दिलं होतं. तसंच त्याच्या कुटुंबाला धमकी देण्यात आली आहे. यावर काल त्याच्या कुटुंबाकडून देखील प्रतिक्रिया देण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर आज या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
Published on: Mar 16, 2025 11:34 AM
Latest Videos

'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...

राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्यांसाठी डोकेदुखी?

हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?

ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
