Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Crime News : बीडमध्ये गुंडाराज! कुख्यात गुंडाची गरीबाला अमानुषपणे मारहाण

Beed Crime News : बीडमध्ये गुंडाराज! कुख्यात गुंडाची गरीबाला अमानुषपणे मारहाण

| Updated on: Mar 05, 2025 | 6:38 PM

Shirur Crime Video Viral : बीडमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. शिरूर तालुक्यात एका गरीब व्यक्तीला कुख्यात गुंडाकडून अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांचा धाक संपला का? असा प्रश्न यामुळे पडत आहे.

बीडमध्ये एका कुख्यात गुंडाचा मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. गुंड सतीश भोसले हा एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण करत असल्याचं या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळे बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारी आणि गुंडप्रवृत्तीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिरूर तालुक्यातील बावी गावात एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. या मारहाणीत व्यक्तीचे सगळे दात तुटले आहेत. तर मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे पोलिसांसोबत संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. मारहाण करण्यात येत असलेला व्यक्ती हा गरीब आहे. त्याच्या शरीरावर प्रत्येक ठिकाणी बेदमपणे मारहाण केली जात असल्याचं बघायला मिळत आहे. मारहाण करणारा हा कुख्यात गुंड असल्याचं समोर आलं आहे.

Published on: Mar 05, 2025 06:38 PM