AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान... महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं, नवव्यांदा सात फेरे घेण्याच्या तयारीत असतानाच... बीडमध्येच आवळल्या मुसक्या

सावधान… महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं, नवव्यांदा सात फेरे घेण्याच्या तयारीत असतानाच… बीडमध्येच आवळल्या मुसक्या

| Updated on: May 06, 2026 | 11:01 AM
Share

बीड जिल्ह्यातील उमापूर गावात बोगस लग्नाच्या नावाखाली मोठ्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. एका मुलीचे तब्बल नऊ वेळा वेगवेगळ्या तरुणांशी लग्न लावून देत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बीड जिल्ह्यातील उमापूर गावात बोगस लग्नाच्या नावाखाली मोठ्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. एका मुलीचे तब्बल नऊ वेळा वेगवेगळ्या तरुणांशी लग्न लावून देत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एजंटांच्या माध्यमातून तरुणांना विवाहासाठी आमिष दाखवले जात होते. सुरुवातीला विश्वास संपादन करून लग्न लावून दिले जात होते, मात्र त्यानंतर काही काळातच मुलगी गायब होत असे. अशा प्रकारे एकाच मुलीचे यापूर्वी आठ जणांशी लग्न लावण्यात आले होते.
दरम्यान, नवव्या नवरदेवासोबतही याच पद्धतीने लग्न लावून देण्यात आले. या प्रक्रियेत संबंधित तरुणाकडून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित नवरदेवाने बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, बोगस लग्नाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे.
लग्नसराईच्या काळात अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

 

 

Published on: May 06, 2026 10:46 AM
Follow Us