परळीत धनंजय मुंडे की पंकजा मुंडे आघाडीवर? कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष
Agricultural Produce Market Committee Election Result 2023 : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतमोजणी; परळीत काय स्थिती? पाहा व्हीडिओ...
परळी, बीड : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतमोजणी सध्या सुरू आहे. परळीतील निकालाकडे सर्वाचं लक्ष लागलंय. परळीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या पॅनलचे 14 उमेदवार आघाडी आहेत. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पॅनलचा 1 उमेदवार आघाडी आहे. मुंडे V/s मुंडे लढाईत धनंजय मुंडेंची आघाडी पाहायला मिळत आहे. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. अवघ्या बीड जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलंय. सकाळी आठ वाजल्यापासून परळी तहसील कार्यालयामध्ये मतमोजणीला सुरुवात झालीये. तीन टप्प्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. परळीत 18 जागेसाठी एकूण 40 उमेदवार रिंगणात होते. 15 वर्षापासून धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या गड राखेल की पंकजा मुंडे बाजी मारणार? हे पाहणं महत्वाचं असेल.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

