Video | चेंबूर दुर्घटनेची चौकशी तर होणारच, राजकारण करु नये : भाई जगताप

मला कसल्याही राजकारणात पडायचं नाही. चेंबूरमधील कार्यकर्त्यांच्या घरात पाच मृत्यू झाले आहेत. या घटनेची चौकशी होणारच आहे.

मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत घडलेल्या दुर्घटनेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चेंबूर येथे दुर्घटना दोन ते अडीच वाजता घडली. ही घटना घडल्यापासून काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी येथे उपस्थित आहेत. तीन वर्षांपूर्वीदेखील अशीच एक घटना घडली होती. मला कसल्याही राजकारणात पडायचं नाही. चेंबूरमधील कार्यकर्त्यांच्या घरात पाच मृत्यू झाले आहेत. या घटनेची चौकशी होणारच आहे. या घटनेचे होणीही राजकारण करु नये, असे भाई जगताप म्हणाले.