अर्धे जामिनावर बाहेर या जेपी नड्डांच्या वक्तव्याचा राऊतांकडून समाचार; म्हणाले… आमचं सरकार
राहुल गांधी जामिनावर आहेत, सोनिया गांधी जामिनावर आहेत आणि डीके शिवकुमार जामिनावर आहेत. अर्धे जामिनावर आहेत, अर्धे तुरुंगात आहेत आणि ते भ्रष्टाचारावर बोलतात.
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कर्नाटकच्या निवडणूक रॅलीत काँग्रेसवर सडकून टीका. त्यांनी काँग्रेस हा पक्षाचा अर्धा भाग आहे. अर्धे नेते तुरुंगात आहेत तर अर्धे जामिनावर बाहेर असून ते भ्रष्टाचारावर बोलत आहेत. राहुल गांधी जामिनावर आहेत, सोनिया गांधी जामिनावर आहेत आणि डीके शिवकुमार जामिनावर आहेत. अर्धे जामिनावर आहेत, अर्धे तुरुंगात आहेत आणि ते भ्रष्टाचारावर बोलतात. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जेपी नड्डा यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. राऊत यांनी नड्डा यांना इशारा देताना आम्हीही भ्रष्टाचारावर जरूर बोलू. पण आमचे सरकार येईल तेव्हा. कारण तुमच्या पार्टीतच मोठमोठं भ्रष्टाचारी आहेत जे तुम्ही घेतले आहेत. त्यांना तुम्ही आपल्या वॉशिंग मशीनमध्ये घालून स्वच्छ करून घेता असा घणाघात केला आहे. तर यावर तुम्ही बोलणार का असा सवाल केला आहे.
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध..
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर

