VIDEO : Chitra Wagh | ‘मलाही दम बघायचाय!’, मेहबूब शेख यांचं आव्हान स्वीकारते : चित्रा वाघ
चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना आव्हान करत म्हटंले आहे की, माझ्या नवऱ्याची नार्को टेस्ट करायला मी तयार आहे. जो मेहबूब शेख माझ्यावर आज आरोप करतोय त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्याने अगोदर 376 चा गुन्हा कशाला म्हणतात, याची माहिती घ्यावी, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मेहबूब शेख यांनी पारनेरच्या सभेत चित्रा वाघ यांचा उल्लेख ‘लाचखोर नवऱ्याची बायको’ असा केला. त्यानंतर चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या आहेत. त्यांनी मेहबूब शेख यांनी दिलेलं आव्हानही स्वीकारलंय. माझ्या नवऱ्याची नार्को टेस्ट करायला तयार असल्याचं सांगत मलाही तुमच्यातला दम बघायचाय, असं प्रतिआव्हान चित्रा वाघ यांनी दिलंय.“जो मेहबूब शेख माझ्यावर आज आरोप करतोय त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्याने अगोदर 376 चा गुन्हा कशाला म्हणतात, याची माहिती घ्यावी, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहे.
Latest Videos
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब

