उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंचा हल्लाबोल
अभिजीत बिचुकले हे येत्या 19 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार, 'मतदार राजा जागृत आहे आणि येत्या 19 एप्रिलला मी अर्ज भरणार आहे. भाजपमध्ये उमेदवारी मिळावी ही उदयन दादांची इच्छा होती, ती पूर्ण झाली पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी करावे. आणि लोकांनीपण करावे.'
साताऱ्याचे आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे येत्या 19 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजेंना संधी मिळाली आता जनतेने यावेळी मला संधी द्यावी. उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला? याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी करावे, अशी प्रतिक्रिया अभिजीत बिचुकले यांनी दिली आहे. अभिजीत बिचुकले म्हणाले, ‘मतदार राजा जागृत आहे आणि येत्या 19 एप्रिलला मी अर्ज भरणार आहे. भाजपमध्ये उमेदवारी मिळावी ही उदयन दादांची इच्छा होती, ती पूर्ण झाली पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी करावे. आणि लोकांनीपण करावे. शक्ती प्रदर्शन म्हणजे काय असतं शक्ती ही युद्धात दाखवायची असते दोन रुपयाची दारू पाजून मटन देऊन शक्ती प्रदर्शन केलं जात नाही’, असे अभिजीत बिचुकले म्हणाले तर शरद पवार आणि उदयनराजे हार्ड वैर आहे. मी सगळ्यांमध्ये एकटा लढतोय यामुळे मला एकदा संधी द्या, असे आवाहनही त्यांनी मतदार जनतेला केले.
Published on: Apr 17, 2024 04:38 PM
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
