Bihar Election Results: आकड्यात अडकले नितीश कुमार, CM होणार की नाही? मुख्यमंत्रीपदावर सस्पेन्स कायम
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठे बहुमत मिळवले आहे, मात्र मुख्यमंत्रीपदावरून सस्पेन्स वाढला आहे. जेडीयूने मुख्यमंत्रीपदावर दावा केला असला तरी, भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. भाजप नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असे स्पष्ट केल्याने नितीश कुमारांच्या दहाव्या टर्मवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मोठे बहुमत मिळाले आहे. या विजयानंतर मुख्यमंत्रीपदावरून मात्र सस्पेन्स निर्माण झाला आहे. जनता दल युनायटेडने (जेडीयू) मुख्यमंत्रीपदावर दावा केला असतानाच, भारतीय जनता पार्टी (भाजप) राज्यात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत भाजपने ९० जागा जिंकल्या, तर जेडीयूला ८३ जागा मिळाल्या. यापूर्वी २०२० मध्ये भाजपने जास्त जागा जिंकूनही नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिले होते. मात्र, यावेळी भाजप नेते नितीश कुमारांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल उघडपणे बोलताना दिसत नाहीत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी सांगितले की, जरी निवडणूक नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली लढवली असली तरी, मुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्व घेईल. यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत भाजप नेतृत्वाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

