Rahul Gandhi Video : राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांना वाहिली श्रद्धांजली
राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त एक ट्वीट करताना आपल्या अकलेचे तारे तोडत आदरांजली वाहण्याऐवजी त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे भाजप आक्रमक झाला आहे.
केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी एक ट्विट करत आपली अक्कल पाळजल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे राहुल गांधी आता एका नव्या वादात अडकले आहे. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त एक ट्वीट करताना आपल्या अकलेचे तारे तोडत आदरांजली वाहण्याऐवजी त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे भाजप आक्रमक झाला आहे. राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर भाजपने त्यावर आक्षेप घेतला असून जोरदार टीका केली आहे. या प्रकरणी भाजपने राहुल गांधी यांना माफी मागण्यास सांगितले आहे. माफी मागितली नाही तर कायदेशीर कारवाईचा इशारा देखील भाजपने राहुल गांधींना दिला आहे.
नेमकं काय केलंय ट्वीट?
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं। अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी। उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा।”. या ट्विटमध्ये राहुल गांधींनी आदरांजली न वाहता शिवरायांना श्रद्धांजली शब्द वापरुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याचे दिसतंय.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

