आपल्याला बारामती जिंकायची आहे, कामाला लागा; कुणी दिल्या कार्यकर्त्यांना सूचना?
VIDEO | बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या खासदार, इतकंच नाही तर शरद पवार यांचं एकहाती वर्चस्व, चंद्रशेखर बावनकुळे यांचा महासंपर्क अभियानंतर्गत बारमती दौरा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत बारामती जिंकायची आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य
बारामती, १३ ऑक्टोबर २०२३ | बारामतीमध्ये सध्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. इतकंच नाही तर या बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचं एकहाती वर्चस्व आहे. दरम्यान, अजित पवार हे आता महायुतीमध्ये शिंदे आणि फडणवीस यांच्या सोबत सत्तेमध्ये सहभागी आहे. अशातच चंद्रशेखर बावनकुळे यांचा महासंपर्क अभियानंतर्गत बारमती दौरा आणि या दौऱ्यावर असताना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत आपल्या बारामती जिंकायची आहे, असे मोठं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती जिंकायची आहे, एवढंच म्हटलं नाही तर कामाला लागा अशा सूचना देखील चंद्रशेखर बानवकुळे यांनी आपल्या भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना दिल्याचे पाहायला मिळत आहे. बावनकुळे यांनी केलेल्या या मोठ्या वक्तव्यानंतर आता भाजप सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार देणार का अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत. तर अजित पवार याला कशाप्रकारे पाठिंबा देणार ? असा सवाल उपस्थित होत असून त्याची चर्चा देखील सुरू झाली आहे.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!

