Chitra Wagh : चित्रा वाघ भडकल्या…ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणाऱ्या प्रणिती शिंदेंची काढली अक्कल अन्…
'ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं हा फक्त भारतीय सैन्याचाच अपमान नाही, तर प्रत्येक देशभक्त आणि नागरिकाच्या अस्मितेवर घाव आहे. सैन्याच्या शौर्याला तमाशा म्हणणाऱ्यांना जनता कधीच माफ करत नाही', असं चित्रा वाघ म्हणाल्या.
संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चा पूर्ण झाली असली तरी, राज्यसभेत अजूनही चर्चा सुरू आहे. लोकसभेत चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक वाद होतांना दिसताय. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अशातच सोलापूर येथील काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरवरील या चर्चेत भाग घेतला. यावेळी त्यांनी या ऑपरेशनबद्दल बोलताना ऑपरेशन सिंदूर हे मीडियासाठी राबवण्यात आलेला एक तमाशा होता, अशी टीका केली. ‘ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी मोहिमेपेक्षा मीडिया शो जास्त होते. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरला ‘तमाशा’ म्हणणारी टिप्पणी आता काढून टाकण्यात आली आहे.
दरम्यान, प्रणिती शिंदेंच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रणिती शिंदे यांना लक्ष्य करत प्रत्युत्तर दिलंय. चित्रा वाघ म्हणाल्या, भर संसदेत भारतीय सैन्याच्या शौर्याला तमाशा म्हणताना प्रणिती शिंदे यांना लाज वाटली नाही का? असा सवाल कर अक्कल ठिकाणावर आहे की नाही? असं विचारण्याची वेळ आली असल्याचे म्हटलंय.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

