AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चा

Video : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चा

| Updated on: May 23, 2022 | 4:23 PM
Share

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट (Water Crisis) झाला आहे. नागरिकांना वेळेत पाणी येत नसल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चाचं (Jal Akrosh Morcha) आयोजन करण्यात आलं आहे. आज दुपारी 4 वाजता हा जल आक्रोश मोर्चा सुरू […]

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट (Water Crisis) झाला आहे. नागरिकांना वेळेत पाणी येत नसल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चाचं (Jal Akrosh Morcha) आयोजन करण्यात आलं आहे. आज दुपारी 4 वाजता हा जल आक्रोश मोर्चा सुरू होणार आहे. या मोर्चात तब्बल 10 हजार ते 15 हजार महिला या मोर्चात सहभागी होणार आहेत. हंडे, कळश्या घेऊनच महिला वर्ग या मोर्चात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा मोर्चा मोठ्या प्रमाणावर निघणार असल्याने पोलिसांनी मोर्चासाठी एकूण 13 अटी घातल्या आहेत. या अटींचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, भाजपच्या या जल आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात जोरदार बॅनरबाजी सुरू झाली आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर औरंगाबादेतील वातावरण ढवळून निघालेले असतानाच आता भाजपचा मोर्चा निघत असल्याने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.

Published on: May 23, 2022 04:23 PM