Kirit Somaiya | एक ना एक दिवस घोटाळे केले त्या सर्वांना जेलमध्ये जावं लागणार- किरीट सोमय्या

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करण्याची तयारी केली आहे. अजित पवारांनी सही केलेला कागद दाखवणार असा दावा सोमय्या यांनी केला आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले आता अजित पवारांना कुणीच वाचवू शकत नाही.

किरीट सोमय्या म्हणाले, “अजित पवारांची एवढी समृद्धी आहे की किरीट सोमय्यांनी पाहायला यावं असे मेसेज फिरतात, तर त्यांच्या कारस्थानाचा एक नमुना आज मी जनतेसमोर आणणार आहे. ठाकरे, पवार यांनी दीड वर्षात अनेक घोटाळे केले, मंत्रालयासमोर बॅनर लावले, माझ्या कुटुंबियांवर आरोप केले, तर उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यात हिम्मत असेल तर माझे घोटाळे बाहेर काढा, चौकशी करा, शिक्षा करा. तुमचे दोन डझन नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले, सातव्या दिवशीही घोटाळे बाहेर निघत आहे”

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI