Duplicate Voters : मतचोरी की व्होटजिहाद? भाजपकडून ‘त्या’ आरोपांवर मविआ अन् मनसेला प्रत्युत्तर, अमित साटम यांनी थेट मांडली आकडेवारी
भाजपकडून अमित साटम यांनी मविआ आणि मनसेला मतचोरीच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी धुळे, बीड, अमरावती, मुंबई उत्तर-मध्य आणि मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघांतील दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी मांडली. ही आकडेवारी उमेदवारांच्या विजयाच्या फरकाशी जोडून, "ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?" असा सवाल साटम यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मतचोरीच्या मुद्द्यावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच संदर्भात भाजपकडून मविआ आणि मनसेला प्रत्युत्तर देताना आमदार अमित साटम यांनी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. साटम यांनी लोकसभा निवडणुकीतील दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी मांडत हा मतचोरीचा प्रकार आहे की व्होट जिहाद, असा सवाल केला आहे.
अमित साटम यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, धुळे लोकसभा मतदारसंघात ४५,७९७ दुबार मुस्लिम मतदार असताना, उमेदवाराचा विजय केवळ ३,८३१ मतांच्या फरकाने झाला. बीडमध्ये ६७,६७९ दुबार मतदारांच्या तुलनेत खासदाराचा विजय ६,५५३ मतांनी झाला. अमरावतीमध्ये २८,२४५ दुबार मतदारांसमोर खासदाराला १९,७३१ मतांनी विजय मिळाला.
मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात ५९,८०५ दुबार मुस्लिम मतदार होते आणि खासदाराचा १६,५१४ मतांनी विजय झाला, तर मुंबई उत्तर-पूर्वमध्ये ३८,७४४ दुबार मतदारांच्या तुलनेत २९,८६१ मतांनी विजय मिळाला. ही आकडेवारी मांडत अमित साटम यांनी मतदारांच्या यादीतील त्रुटी आणि निवडणुकीच्या निकालावर त्यांचा संभाव्य परिणाम यावर लक्ष वेधले आहे.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

