Kirit Somaiya | संजय राऊतांनी ईडीला 55 लाख दिले, अडसूळांनी त्यांच्याकडून शिकावं – किरीट सोमय्या

Kirit Somaiya | संजय राऊतांनी ईडीला 55 लाख दिले, अडसूळांनी त्यांच्याकडून शिकावं – किरीट सोमय्या

| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 8:42 AM

संजय राऊतांनी ईडीला 55 लाख दिले, अडसूळांनी त्यांच्याकडून शिकावं - किरीट सोमय्या. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी परत केलं होते.

संजय राऊतांनी ईडीला 55 लाख दिले, अडसूळांनी त्यांच्याकडून शिकावं – किरीट सोमय्या. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी परत केलं होते. सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर वर्षा राऊत यांनी हे पाऊल उचललं होते. संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी हे पैसे परत केले होते. वर्षा राऊत या ‘ठाकरे’ चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत.