नितीन गडकरींच्या ‘लाडकी बहिणी’च्या वक्तव्यानं महायुती सरकारचीच कोंडी? विरोधकांच्या आरोपांना बळ?
सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत आहे. त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळतील की नाही, याची शाश्वती नाही, असे भाजप नेते, मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. तर गुंतवणुकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते, असं वक्तव्यही नितीन गडकरी यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यामुळे सरकारची चांगलीच गोची झाली आहे. विरोधक जे आरोप करताय, त्याला नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्याने बळ मिळालं आहे. एकीकडे विरोधकांनी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने अनेक योजना आणि पगारांचे पैसे अडकवल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे अनेक क्षेत्रातील सबसिडीचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी दिले जात असल्याचे वक्तव्य स्वतः नितीन गडकरी यांनी केलं. कोणत्याही सत्ताधाऱ्यांना दूर ठेवण्याचं आवाहनही नितीन गडकरी करतात. तर आदिती तटकरे हे लाडकी बहीण योजनेसाठी वारंवार नितीन गडकरी यांचं मार्गदर्शन मिळाल्याचा दावा करतात. दरम्यान, सरकार योजना आणि सवलतींवरून होणाऱ्या खर्चाला अजित पवार यांचं वित्त खातं वारंवार नकारात्मक शेरा देत असतानाही सरकारकडून मात्र मंजुरीचा शेरा मिळत असल्याचे समोर येतंय.
Latest Videos
Latest News