‘संजय राऊत तमाशावाला, कधी मातोश्रीवर तर कधी…’, भाजप नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते नितेश राणे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. नितेश राणे आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असून त्यांच्या टीकेचा स्तर दिवसेंदिवस ढासळल्याचे दिसतेय. नितेश राणेंनी राऊतांवर जिव्हारी लागणारी टीका केली आहे.
भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत तमाशावाला आहे, असं वक्तव्य करत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर संजय राऊत कधी मातोश्रीवर तर कधी सिल्व्हर ओकवर नाचतो, असा एकेरी उल्लेख करत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. ‘आम्हाला पण तमाशाच्या शो ची तिकीट पाहिजे. कारण संजय राजाराम राऊत हा तमाशावाला आहे. कुठे नेमका तमाशा करतो हे त्याला विचारा.. कधी मातोश्रीवर तर कधी सिल्व्हर ओकवर नाचून दाखवतो नाच्या… हल्ली दिल्ली येथे कॉन्ट्रॅक मिळाला आहे संजय राऊतला नाचायला…’, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. दरम्यान, नितेश राणेंनी या जिव्हारी लागेल अशा केलेल्या टीकेवर संजय राऊत यांच्याकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.