संजय राऊत यांच्यापेक्षा आदित्य ठाकरे यांना गोव्याची जास्त माहिती, Nitesh Rane यांची खोचक टीका

गोव्यात किती विकास झाला हे संजय राऊतांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी आदित्य ठाकरे यांना विचारावं. कारण त्यांना माहिती आहे की गोव्याचा किती छान विकास झालाय, असा टोलाही नितेश राणेंनी लगावला आहे.

मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. गोवा विधानसभा निवडणुकीवरुन संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राऊतांच्या या टीकेला आता नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत जिथे जिथे जातात तिथे आमची सत्ता येते. बेळगावमध्ये काय झाले? आज मी देवाचे आभार मानले की त्यांच्यावर अशीच जबाबदारी दे. कारण हा माणूस सगळीकडे जाऊन फक्त शिवसेना संपवण्याचं काम करत आहे, अशी घणाघाती टीकाही नितेश राणेंनी केलीय. गोव्यात किती विकास झाला हे संजय राऊतांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी आदित्य ठाकरे यांना विचारावं. कारण त्यांना माहिती आहे की गोव्याचा किती छान विकास झालाय, असा टोलाही नितेश राणेंनी लगावला आहे. संजय राऊत यांचे गोव्याला पाय लागल्यामुळे आता गोव्यात आमचा मुख्यमंत्री बसणार हे माझं ठाम मत आहे. पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू आणि आणि येथे संजय राऊत हे एकाच तालमीत बसणारे लोक आहेत. पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू जसं काँग्रेस संपवण्याचं काम करत आहेत, तसंच काम येथे संजय राऊत करत आहेत. संजय राऊत हे भाजपसाठी पोषक काम करत आहेत, असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI