दगाफटका अन् राजकीय वनवास… पंकजा मुंडे यांनी पुन्हा व्यक्त केली जाहीरपणे नाराजी
बीडमध्ये बोलत असताना पंकजा मुंडे यांनी नाराज होत आपली तीव्र भावना बोलून दाखवली. मात्र यानंतर जनतेचं दहापट प्रेम मिळाल्याचे त्यांनी म्हटले. पंकजा मुंडेंच नव्हे तर भाजपचे १० मंत्री सोडले तर इतर सर्वच मंत्री वनवासात असल्याचा टोला अनिल देशमुख यांनी भाजपला लगावला आहे
मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा उघड-उघडपणे नाराजी व्यक्त केली. माझ्यासोबत दगा फटका झाला, राजकीय वनवास मिळाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. तर पंकजा मुंडे यांना आजही पक्षात स्थान आणि सन्मान आहे आणि उद्याही राहणार आहे, असे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. बीडमध्ये बोलत असताना पंकजा मुंडे यांनी नाराज होत आपली तीव्र भावना बोलून दाखवली. मात्र यानंतर जनतेचं दहापट प्रेम मिळाल्याचे त्यांनी म्हटले. पंकजा मुंडेंच नव्हे तर भाजपचे १० मंत्री सोडले तर इतर सर्वच मंत्री वनवासात असल्याचा टोला अनिल देशमुख यांनी भाजपला लगावला आहे. अजितदादा गट महायुतीत आल्याने परळीतील जागा धनंजय मुंडे यांना मिळणार, अशा चर्चा रंगताय. मात्र पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधाननंतर यावर शिक्कामोर्तब झाला का? असा सवाल देखील केला जात आहे.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

