AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साडे तीन लाखांच्या मताधिक्क्याने कसं निवडून दिलं?, Raosaheb Danve यांनी सांगितला निवडणुकीचा किस्सा

| Edited By: | Updated on: Sep 25, 2021 | 6:49 PM
Share

एकही सभा न घेता दानवे एवढ्या फरकाने कसे निवडून आले? असा सवाल लोणीकरांनी खोतकरांना केला. त्यावर, लोकांना वाटले असेल हा लई सीरियस असेल. शेवटचं मत देऊन टाकावं. म्हणून निवडून आले असतील, असं खोतकरांनी सांगितलं.

पुणे: केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे जिथे जातात तिथे जुन्या आठवणींना उजाळा देत एक एक रंजक किस्से सांगत असतात. त्यामुळे त्यांच्या भाषणांना अलोट गर्दी लोटते. पुण्यातही त्यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीचा किस्सा सांगितला. त्यांना लोकांनी साडे तीन लाखांच्या मताधिक्क्याने कसं निवडून दिलं याचं गुपितच सांगितलं. रावसाहेब दानवे आज पुण्यात होते. एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी निवडणुकीतील विजयाचा किस्साच सांगितला. निवडणुकीत दरम्यान आजारी असतानाही मी साडेतीन लाखाच्या फरकाने निवडून आलो. निवडून आल्यावर मी विजयाचा प्रमाणपत्रं घ्यायला गेलो होतो. त्यावेळी अर्जुन खोतकर आणि बबनराव लोणीकर सोबत होते. मला एवढं मोठं मताधिक्य पडल्याने लोणीकरांना मोठा प्रश्न पडला. एकही सभा न घेता दानवे एवढ्या फरकाने कसे निवडून आले? असा सवाल लोणीकरांनी खोतकरांना केला. त्यावर, लोकांना वाटले असेल हा लई सीरियस असेल. शेवटचं मत देऊन टाकावं. म्हणून निवडून आले असतील, असं खोतकरांनी सांगितलं. दानवे यांनी हा किस्सा ऐकवताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तो इतका की दानवेंनाही हसू अवरेना झालं.