Sudhir Mungantiwar Video : मंत्रीपद हुकलं , नाराजीच्या बातम्यावरून सुधीरभाऊंनी थेट गाणंच गायलं, ‘तुझसे नाराज नहीं..’
आज सुधीर मुंगंटीवारांनी विधानसभेत एक गाणंच गायल्याचे पाहायला मिळाले. सुधीर मुंगंटीवारांनी गायलेल्या या गाण्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय
मंत्री पद न मिळाल्याने आपण नाराज नाही हे सांगण्यासाठी सुधीर मुंगंटीवारांनी विधानसभेत गाणं गायल्याचे पाहायला मिळाले. तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं हे गाणं सुधीर मुंगंटीवारांनी गायलं होतं. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही खंत व्यक्त केली की मी नाराज आहे असं सर्वांना वाटतं असंही सुधीर मुंगंटीवार म्हणाले. ‘एका गोष्टीची मला थोडी खंत वाटते. अध्यक्ष महाराज आता ही खंत व्यक्त करताना माझी मोठी अडचण होते. मी काही बोललो की मग ते म्हणतात की मंत्री केलं नाही म्हणून नाराज आहे’, असं ते म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, खरंतर तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं हे गाणं मला आवडतं. कारण आमचे नेते ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो ते नितीन गडकरी नेहमीच एक मस्त गाणं ते गुनगुनतात की तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं कधी कधी जेव्हा पत्रकार विचारतात की तुम्ही नाराज आहे का तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं.. असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी आपल्या मनातील सल पुन्हा बोलून दाखवली.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
