Special Report | गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत नेमके नाराज का झाले होते?

एका व्हायरल मेसेजमुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कामगारांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं. पडळकर-खोत यांनी या आंदोलनातून अंग काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकच गोंधळ झाला.

| Updated on: Nov 24, 2021 | 9:55 PM

मुंबई: राज्य सरकारने एसटी कामगारांना दिलेल्या पगार वाढीच्या ऑफरवर आज चर्चा होणार असतानाच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका व्हायरल मेसेजमुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कामगारांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं. पडळकर-खोत यांनी या आंदोलनातून अंग काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकच गोंधळ झाला. एसटी कामगारांनी या दोन्ही नेत्यांना रोखून धरल्याने अखेर हे संकट टळलं. मात्र, हे मेसेज कुणी व्हायरल केले याबाबतचं गुढ अजूनही कायम आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत काल गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटीच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. यावेळी कामगारांना विलीनीकरण होईपर्यंत अंतरीम वेतनवाढ देण्याचा पर्याय समोर आला. त्यावर आज पुन्हा चर्चा होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच पडळकर आणि खोत यांच्याबाबतचे काही मेसेज व्हायरल झाले. त्यामुळे पडळकर आणि सदाभाऊ खोत प्रचंड नाराज झाले. त्यांची नाराजी त्यांनी थेट कामगारांना बोलून दाखवली. त्यामुळे आंदोलनस्थळी संभ्रमाचं वातावरण झालं होतं.

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.