भाजप नेत्या Manda Mhatre यांनी राष्ट्रवादी कार्यालयात घेतली Jayant Patil यांची भेट
भाजप आमदार मंदा म्हात्रे या खरंतर आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. मधल्या काळात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. त्याच्या भाजप प्रवेशाची चर्चाही जोरात रंगली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा मंदा म्हात्रे या बऱ्याच काळानंतर पुन्हा राष्ट्रवादी कार्यालयात गेल्यामुळे त्यांच्या या भेटीची चर्चा जोरात रंगली आहे.
मुंबई : भाजप आमदार मंदा म्हात्रे (BJP MLA Manda Mhatre) राष्ट्रवादी कार्यालयात (NCP Office) गेल्या. तिथं त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची भेटही घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं नसतं, तरच नवल! झालंही अगदी तसंच. भाजप आमदार मंदा म्हात्रे या खरंतर आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. मधल्या काळात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. त्याच्या भाजप प्रवेशाची चर्चाही जोरात रंगली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा मंदा म्हात्रे या बऱ्याच काळानंतर पुन्हा राष्ट्रवादी कार्यालयात गेल्यामुळे त्यांच्या या भेटीची चर्चा जोरात रंगली आहे. या भेटीदरम्यान, त्यांनी जयंत पाटील यांच्यासोबत बातचीत केली. या वेळी झालेल्या चर्चेत नेमकं काय झालं, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. दरम्यान, मंदा म्हात्रे यांनी विकासकामांसाठी भेट घेतली असल्याचं सांगितलं जातंय. मात्र या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
