Suresh Dhas Video : ‘… तर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंना कोण अडकवणार?’, सुरेश धस स्पष्टच म्हणाले…
'आकाच्या पुढे एसआयटी गेल्यानंतर मग बोलू', असं म्हणत सुरेश धस यचांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर थेट भाष्य केले नाही. पुढे ते असेही म्हणाले, मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की नाही हे त्यांच्या पक्षांचे वरिष्ठ ठरवतील.', सुरेश धस काय म्हणाले?
‘अंजली दमानिया आणि करूणा शर्मा काय म्हणाल्या? यापेक्षा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदापासून दूर रहावं, अशी मागणी त्यांच्याच पक्षातील काही आमदारांनी केली आहे. अनेक संघटना अशी मागणी करताय. पण मी अद्याप धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला नाही. कारण संतोष देशमुख प्रकरणाचा तपास सुरू असून एसआयटी सध्या आकापर्यंत गेली आहे. आकाच्या पुढे एसआयटी गेल्यानंतर मग बोलू’, असं म्हणत सुरेश धस यचांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर थेट भाष्य केले नाही. पुढे ते असेही म्हणाले, मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की नाही हे त्यांच्या पक्षांचे वरिष्ठ ठरवतील. कारण त्यांच्या पक्षांची जास्त बदनामी होतेय. बीडमधील जनतेला गुंडाच्या दबावाखाली रहावं लागत होतं. पण आता नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. काहींनी घर दार सोडून ५०० लोकं परळी बाहेर निघून गेलेत, अशी माहितीही सुरेश धस यांनी दिली. तर अंजली दमानिया त्यांच्या पातळीवर बोलताय मी त्यावर काही बोलणार नाही. एसआयटी याचा तपास करत आहे. परंतू जर धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख प्रकरणात संबंध असेल तर एसआयटी त्यांच्यापर्यंत पोहोचेल. जर धनंजय मुंडे या प्रकरणात असतील तर ते दोषी होतील. जर त्यांचा सहभागच नसेल तर त्यांना बळजबरी कोण अडकवणार आहे? असा सवालही सुरेश धस यांनी केला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

