Suresh Dhas Video : ’15 जेसीबी, 100 राखेचे टिप्पर अन्…’, कराडनंतर आता सुरेश धसांचे परळीच्या पोलीस हेड कॉन्स्टेबलवर गंभीर आरोप, क्लिप व्हायरल
भास्कर केंद्रे हेड कॉन्स्टेबल परळी शहर पोलीस ठाणे... याच भास्कर केंद्रे यांच्यावर भाजपच्या सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेत. १५ जेसीबी, १०० राखेचे टिप्पर आणि मटक्या वाल्यांशी संबध असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय.
भाजप आमदार सुरेश धस यांनी परळी पोलीस ठाण्यातील एका हेड कॉन्स्टेबलवर गंभीर आरोप केलेत. १५ जेसीबी, १०० राखेचे टिप्पर आणि मटक्या वाल्यांशी संबंध भास्कर केंद्रे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याचे असल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय. यानंकर भास्कर केंद्रे यांनी सुरेश धस यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. पण त्यापूर्वी भास्कर केंद्रे यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांचा दरवाजा ठोठावलाय. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्या संवाद साधताना सुरेश धसांनी केलेले आरोप खोटे असल्याचे भास्कर केंद्रे यांनी म्हटलंय. टिप्पर सोडा माझ्याकडे साधं टायर जरी आढळलं तर मी पोलीस खात्यातून राजीनामा देईल, असं केंद्रे यांनी म्हटलंय. तर एका जुन्या प्रकरणावरून सुरेश धस आपल्यावर आरोप करत असल्याचे भास्कर केंद्रे यांचे म्हणणं आहे. दरम्यान, सुरेश धस यांनी बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतरही पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. गंभीर आरोप झाल्यानंतर हेड कॉन्टेबल असणाऱ्या भास्कर केंद्रे यांनी न्यायासाठी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे धाव घेतली. मात्र भास्कर केंद्र यांनी सुरेश धसांविरोधात अद्याप एक तक्रारही दिली नाही. बघा वकील सदावर्ते आणि भास्कर केंद्रे यांच्यातील संवाद
