मोदींबाबतचं विधान व्हायरल झाल्यानंतर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या…

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक विधान केलंय. या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी या सगळ्यावर स्पष्टीकरण दिलंय.

आयेशा सय्यद

|

Sep 28, 2022 | 1:24 PM

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक विधान केलंय. या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. यानंतर फेसबुक पोस्ट लिहित पंकजा मुंडे यांनी या सगळ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “मोदींजींच्या (PM Narendra Modi) वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम केले. त्यात ‘बुद्धिजीवी संमेलन’मधील माझ्या भाषणाच्या highlights… आपल्यापर्यंत एक ओळ आलीच आहे. ‘सनसनीखेज’ बातम्यांतून जमले तर हे ही पहा, मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या link वर आहेच”, असं पंकजा आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें