राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा; म्हणाले, LIC, SBI आणि EPFO पैसा…
गांधी म्हणाले की, एलआयसी, एसबीआय आणि ईपीएफओचे भांडवल अदानींना दिले जात आहे, पण ना तपास होत आहे, ना जबाबदारी आहे
नवी दिल्ली : मी सावरकर नाही, गांधी आहे. माफी मागणार नाही, असे म्हणत भाजपचा राग राहुल गांधींनी ओढावून घेतला. त्यावरून सध्या त्याच्यावर टीका होत आहे. तर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यापासून काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मी प्रश्न विचारतोय म्हणून माझ्यावर कारवाई करण्यात आली. माझे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोदींवर हल्ला चढवत एलआयसी, एसबीआय आणि ईपीएफओ भांडवलावरून प्रश्न विचारला आहे.
गांधी म्हणाले की, एलआयसी, एसबीआय आणि ईपीएफओचे भांडवल अदानींना दिले जात आहे, पण ना तपास होत आहे, ना जबाबदारी आहे. शेवटी पंतप्रधान मोदी इतके घाबरले का? असे म्हटले होते. राहुल गांधींनी ट्विट करून विचारले की, जनतेचा निवृत्तीचा पैसा अदानींच्या कंपन्यांमध्ये का गुंतवला जात आहे?
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

