West Bengal | मोठी बातमी! पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी
पश्चिम बंगालमध्ये भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. मात्र, मुख्यमंत्री पदासाठी पक्षाने अजूनही कोणता चेहरा घोषित केलेला नाही. पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले आहे. आता लवकरच बंगालचे मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. मात्र, मुख्यमंत्री पदासाठी पक्षाने अजूनही कोणता चेहरा घोषित केलेला नाही. पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले आहे. आता लवकरच बंगालचे मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाणार आहे. मात्र याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
अलीकडेच पश्चिम बंगालच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री कोण होणार याचे नाव जवळपास निश्चित झाले आहे, या बाबतची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बंगालमध्ये भाजपने 206 जागा जिंकल्या आहेत, तर ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाने 80 जागा जिंकल्या आहेत. यादरम्यान भाजपमधील पक्षश्रेष्ठी कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांना पराभूत करणारे सुवेंदू अधिकारी हे बंगालचे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. 9 मे हा रवींद्रनाथ टागोर यांचा जयंती दिवस आहे. भाजप अध्यक्षांच्या मते, त्याच दिवशी बंगालचे नवे मुख्यमंत्री शपथ घेतील.
Published on: May 05, 2026 01:13 PM
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...

