Nagpur | महापालिका निवडणुकीसाठी भाजपचं मिशन नागपूर, फडणवीसांकडून भेटीगाठीचा सिलसिला

नागपुरात सध्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. देवेंद्र फडणवीस नागपूर महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जनसंपर्क वाढवला असून कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी गाठी घेणं सुरु आहे. फडणवीस यांनी आठवड्यातील दोन दिवस नागपूरमध्ये मुक्काम सुरु केला आहे.

नागपुरात सध्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. देवेंद्र फडणवीस नागपूर महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जनसंपर्क वाढवला असून कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी गाठी घेणं सुरु आहे. फडणवीस यांनी आठवड्यातील दोन दिवस नागपूरमध्ये मुक्काम सुरु केला आहे. भाजपचं मिशन नागपूर मनपा निवडणूक सुरु असून त्यासाठी देवेंद्र फडणवीस अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

नागपूर महानगरपालिका निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे, त्यामुळेच भाजपच्या दिग्गज नेत्यांचा नागपुरात जनसंपर्क वाढवलाय. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील जनसंपर्क वाढवलाय. दर आठवड्याचे दोन दिवस फडणवीस नागपूरात मुक्कामी असतात आणि घरी जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत.

आज सकाळपासून नागपूर शहरात फडणवीस यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. आज सकाळी शहरातील सुभाषनगर भागातून फडणवीस यांचा दौरा सुरु झाला. दिवसभर ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.नागपूर महानगरपालीकेत 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI