KumbhMela 2025 Video : भगवे कपडे अन् गळ्यात रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात बॉलिवूड अभिनेत्री संन्यासी, नावही बदललं

KumbhMela 2025 Video : भगवे कपडे अन् गळ्यात रूद्राक्ष माळ्या… किन्नर आखाड्यात बॉलिवूड अभिनेत्री संन्यासी, नावही बदललं

| Updated on: Jan 24, 2025 | 9:05 PM

तब्बल २५ वर्षांनी ममता कुलकर्णी ही भारतात परतली आहे. ममता कुलकर्णी ही सध्या प्रयागराज महाकुंभला पोहोचली आहे. सध्या ममता कुलकर्णीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णींनी संन्यासाची दीक्षा घेतली आहे. महाकुंभ 2025 मध्ये किन्नर अखाड्यामध्ये संन्यासाची दीक्षा घेतली. ममता कुलकर्णी आता श्री यामाई ममता नंदगिरी या नावाने ओळखली जाणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने कुंभमेळ्यात संन्यास घेतला यावेळी ममता कुलकर्णीने अंगावर भगवे कपडे परिधान केले होते तसेच गळ्यात रुद्राक्षाची माळा होती. प्रयागराज येथील महाकुंभात किन्नर अखाड्यात ममता कुलकर्णीने संन्यासाची दीक्षा घेतली. ममता कुलकर्णीला किन्नर अखाड्याच्या महामंडलेश्वर उपाधीनं सन्मानित करण्यात आले. ममता कुलकर्णीला नवीन नाव देखील देण्यात आले. आजपासून श्री यामाई ममता नंदगिरी या नवीन नाव ममता कुलकर्णी ओळखली जाणार आहे. आचार्य लक्ष्मी नारायण किन्नर अखाड्याच्या प्रमुख आहेत. दरम्यान, किन्नर अखाडा 13 ऑक्टोबर 2015 रोजी अस्तित्वात आला. बऱ्याच संघर्षानंतर किन्नर अखाड्याचा प्रमुख अखाड्यांमध्ये समाविष्ट झालाय. कुंभमेळ्यात सहभागी होऊन किन्नर अखाड्याकडून समानतेचं प्रदर्शन करण्यात येतं. किन्नर अखाड्यासाठी हा दुसरा कुंभमेळा आहे.

Published on: Jan 24, 2025 09:04 PM