AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगवे वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा अन्… ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, साध्वी बनत नावात केला मोठा बदल

नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी २५ वर्षांनंतर भारतात परतल्या आहेत आणि त्यांनी कुंभमेळ्यात संन्यास घेतला आहे. आता ममता नंद गिरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ममता किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर होणार आहेत. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात त्या साध्वीच्या वेशात दिसत आहेत.

भगवे वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा अन्... ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, साध्वी बनत नावात केला मोठा बदल
Mamta Kulkarni
| Updated on: Jan 24, 2025 | 5:36 PM
Share

Mamta Kulkarni Become Sadhvi :  नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीने तिच्या सौंदर्याने सर्वांना वेड लावलं होतं. प्रसिद्धीच्या झोतात असताना ती अचानक सिनेसृष्टीतून गायब झाली. यानंतर आता तब्बल २५ वर्षांनी ममता कुलकर्णी ही भारतात परतली आहे. ममता कुलकर्णी ही सध्या प्रयागराज महाकुंभला पोहोचली आहे. सध्या ममता कुलकर्णीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात फोटोत ममता कुलकर्णी ही साध्वीच्या वेशात पाहायला मिळत आहे.

ममता कुलकर्णीने घेतला संन्यास

ममता कुलकर्णीने महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला आहे. ममता कुलकर्णी आज किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनणार आहे. याआधी तिचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत ममता कुलकर्णीने अंगावर भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत. त्यासोबतच गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि खांद्यावर एक झोली लटकवलेल्या स्वरुपात दिसत आहे. यामुळे ममता कुलकर्णीने संन्यास घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तिने सिनेसृष्टीचा मार्ग सोडून धार्मिक मार्ग स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे.

नावात बदल

ममता कुलकर्णी ही साधवीच्या वेषात किन्नर आखाड्यात दिसली होती. किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बांधले जात असून, त्यात पट्टाभिषेक केल्यानंतर ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर ही पदवी देण्यात येणार आहे. त्यापूर्वी ममताने आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. याचे फोटोही व्हायरल झाले. विशेष म्हणजे ममता कुलकर्णीने तिच्या नावातही बदल केला असून ती आता ‘श्री यामाई ममता नंद गिरि’ या नावाने ओळखली जाणार आहे.

फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

विशेष म्हणजे ममता कुलकर्णीने स्वत: इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या फोटोत ममता कुलकर्णी ही साध्वीच्या रुपात पाहायला मिळत आहे. मी आज कुंभमेळ्यात जाणार आहे. येत्या २९ जानेवारीला मौनी अमावस्येला शाही स्नान करुन मी विश्वनाथ मंदिरात जाईन. यानंतर मी अयोध्येत जाऊन तिथे पिंडदान करेन, अशी माहिती ममता कुलकर्णीने दिली आहे. दरम्यान ममता कुलकर्णीचे साध्वी बनल्यानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या पोस्टवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत.

पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.