Marathi News Videos Bomb threat Call to Maharashtra Police control room Yerawada, Pune Station and Bhosari of Pune

Pune BIG News : पुण्यातील हे 3 ठिकाणं बॉम्बने उडवणार, पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला फोन अन्…
पुण्यातील तीन ठिकाणांवर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा पोलिसांना धमकीचा फोन आला. यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवली पण कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. तरी तपास सुरू आहे.
पुण्यातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील येरवडा, पुणे स्टेशन आणि भोसरी भागात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा फोन आला आहे. पुण्यातील या तीन ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या धमकीच्या फोननंतर पोलिसांकडून मोठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. धमकी नेमकी कोणाकडून आली याचा शोध रेल्वे पोलीस आणि पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीमुसार, पुण्यातील हे तीन ठिकाणी बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन कॉल आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या ११२ या आप्तकालीन क्रमांकावर आला. या धमकीच्या फोनमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Published on: May 21, 2025 3:40 PM
Related Video
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
सातारा-सांगलीतून मोठी बातमी... विधान परिषदेबाबत शिंदेंचा मोठा आदेश...
चित्रपटाची कथा पाहिजे तर अशी, 'देऊळ बंद 2'ने रचला इतिहास, कमाई पाहून..
Monsoon: काय? थेट अरबी समुद्रातले ढगच गायब? आता पाऊस थेट...
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!