Chandrashekhar Bawankule | बुलडाण्याचा पुढचा खासदार भाजपचाच, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान
Chandrashekhar Bawankule | बुलडाणा जिल्ह्याचा आगामी खासदार हा भाजपचाच असेल, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
Chandrashekhar Bawankule | बुलडाणा जिल्ह्याचा(Buldana District) आगामी खासदार (MP)हा भाजपचाच असेल, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी केले आहे. आता त्यांच्या या विधानामुळे बुलडाण्याच्याच नव्हे तर विदर्भाच्या राजकीय भूमित नवीन वादाला तोंड फुटले आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात शिवसेना तळागाळात मजबुतीने उभी आहे. बंडखोरीनंतर ही सध्याचे आमदार, खासदार यांनी शिंदे गटाची कास धरली आहे. दोन शिवसेना (Shivsena) अस्तित्व दाखवण्यासाठी भांडत आहेत. तर भाजपने आगामी निवडणुकांचे नियोजन सुरु केले आहे. शिंदे गट आणि भाजपात निवडणुकीत युती होईल की नाही, कोणत्या जागा, मतदारसंघ याविषयी प्राथमिक बोलणी ही झाली नसताना शिवसेनेने अनेक वर्ष सांभाळून ठेवलेल्या या मतदारसंघावर भाजपने आपला हक्क अगोदरच सांगून टाकला आहे. त्यामुळे शिंदे गोटात गेलेले आमदार आणि खासदार यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे आहे.
अॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप

