पुण्यातील शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिकांवर एका मुलीकडून अत्याचाराचे आरोप
शिवसेना कामगार नेते रघुनाथ बबनराव कुचिक (Raghunath Babanrao Kuchik) याच्याविरोधात24 वर्षीय तरुणीला लग्नाच्या भूलथापा देत तिच्यावर बलात्काराचा केल्याचं गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना कामगार नेते रघुनाथ बबनराव कुचिक (Raghunath Babanrao Kuchik) याच्याविरोधात24 वर्षीय तरुणीला लग्नाच्या भूलथापा देत तिच्यावर बलात्काराचा केल्याचं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ती गरोदर राहिली.त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करून त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान पिडित मुलीनं फेसबुकवर एक पोस्ट लिहली असुन अत्याचाराचा आरोप केलाय. व्हाट्सअप चॅट (Whatsapp chat)देखील फेसबुकवर टाकलं आहे. यानंतर मुलीच्या फेसबुक पोस्टनंतर(Facebook post) रघुनाथ कुचिक यांनी पुणे सायबर पोलीसांत तक्रार दाखल केलीय असून ,मुलीकडून माझी बदनामी सुरु असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

