Chandrakant Patil | पर्रिकरांना उमेदवारी दिल्यास बिनविरोध करणार का? : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil | पर्रिकरांना उमेदवारी दिल्यास बिनविरोध करणार का? : चंद्रकांत पाटील

| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 7:17 PM

दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला उमेदवारी देण्यावरूनही ते टीका टिप्पणी करत आहेत. उत्पल पर्रिकर यांना भाजपाने उमेदवारी दिली तर त्यांना बिनविरोध विजयी करण्याची हमी शिवसेना आणि इतर पक्ष देणार का, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना केलाय.

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीवरुन (Goa Assembly Election) राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. त्याला प्रत्युत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संजय राऊतांना गोव्यातून लढण्याचं थेट आव्हानंच दिलं आहे. त्याचबरोबर संजय राऊत गोवा विधानसभेच्या विषयावरून बरीच वक्तव्ये करतात. दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला उमेदवारी देण्यावरूनही ते टीका टिप्पणी करत आहेत. उत्पल पर्रिकर यांना भाजपाने उमेदवारी दिली तर त्यांना बिनविरोध विजयी करण्याची हमी शिवसेना आणि इतर पक्ष देणार का, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना केलाय.