AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrashekhar Bawankule | निवडणुकीआधीच बावनकुळेंचा मोठा दावा! सर्व बंडखोर माघार घेणार; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचाच विजय?

Chandrashekhar Bawankule | निवडणुकीआधीच बावनकुळेंचा मोठा दावा! सर्व बंडखोर माघार घेणार; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचाच विजय?

| Updated on: Jun 04, 2026 | 12:14 PM
Share

राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध मतदारसंघांतील बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, महायुतीतील बहुतांश अपक्ष आणि बंडखोर उमेदवार सकारात्मक चर्चेनंतर आपले अर्ज मागे घेण्याच्या तयारीत आहेत.

राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध मतदारसंघांतील बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, महायुतीतील बहुतांश अपक्ष आणि बंडखोर उमेदवार सकारात्मक चर्चेनंतर आपले अर्ज मागे घेण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संबंधित उमेदवारांशी चर्चा केली असून त्यातून सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

विधान परिषद निवडणूक ही संख्याबळावर आधारित असल्याने ज्या ठिकाणी विजयाची शक्यता नाही, त्या ठिकाणी काँग्रेसनेही व्यावहारिक भूमिका घेत अर्ज मागे घ्यावेत, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. “ही निवडणूक जनतेच्या थेट मतदानातून होत नाही. ज्या पक्षाकडे अधिक सदस्यसंख्या आहे, त्यांचाच विजय निश्चित असतो. त्यामुळे अनावश्यक निवडणूक टाळून बिनविरोध निवडणुकीचा मार्ग स्वीकारावा,” असे ते म्हणाले. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा करत नागपूर, भंडारा, अमरावतीसह राज्यातील सर्व १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दुपारी ३ वाजेपर्यंत बंडखोर उमेदवारांबाबतचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि कोणतीही मोठी बंडखोरी शिल्लक राहणार नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या नाराजीबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, “माझी कालच सत्तार यांच्याशी चर्चा झाली. ते पूर्णपणे समाधानी आहेत. काही मुद्द्यांवर मतभेद असू शकतात, मात्र मनभेद नाहीत.” यवतमाळमधील काँग्रेसच्या उमेदवारीवर टीका करताना त्यांनी म्हटले की, ज्या ठिकाणी मतांचे गणित स्पष्ट आहे, तिथे केवळ पराभवासाठी निवडणूक लढवण्यात अर्थ नाही. विदर्भातील पाचही जागांवर महायुतीचा विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला.

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरांची भूमिका, उमेदवारी माघारी आणि महायुतीचे संख्याबळ यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

Published on: Jun 04, 2026 12:14 PM

Follow Us
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य.

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया