Sambhaji vs Chhaava : ‘छावा’ची सर्वत्र चर्चा पण चित्रपटानंतर अमोल कोल्हे यांचं का होतंय ट्रोलिंग? ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ अन् ‘छावा’वरून वाद-प्रतिवाद
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील मालिका आणि सिनेमा यांच्यातील तुलनेवरून वाद-प्रतिवाद रंगला आहे. या वादाविषयी अभिनेते अमोल कोल्हे यांनी दिलेले उत्तर ऐकूया.
छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियात सिनेमा आणि अमोल कोल्हेंनी भूमिका साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील स्वराज्यरक्षक मालिका यांची तुलना झाली. छत्रपती संभाजी महाराज यांना क्रूरपणे मारलं गेलं हे मालिकेत नीट का दाखवलं गेलं नाही? यावरून अभिनेता अमोल कोल्हे यांना सवाल करण्यात आले. स्वराज्यरक्षक मालिकेत भूमिका करणारे अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या दाव्याची दिवसभर चर्चा झाली. संभाजी महाराजांवर झालेले अत्याचार मालिकेत का दाखवले गेले नाही. म्हणून छावा चित्रपटाच्या चर्चेदरम्यान, अमोल कोल्हेंना सवाल केले गेले. त्यावर इतकी हिंसा दाखवण्यावर माध्यम म्हणून टिव्ही आणि मालिकेबाबत अनेक नियम होते, असं उत्तर कोल्हेंनी दिलं. कोल्हे यांच्या दाव्यांनुसार छाया सिनेमानंतर त्यांना उजव्या विचारसरणीच्या लोकांनी ट्रोल केले. त्यावर स्वराज्यरक्षक मालिकेविषयी आणि संभाजी राजांची पुस्तकांमधून बदनामी होत असताना ही मंडळी कुठे होती असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला आहे. इतक्या वर्षानंतर कोल्हे यांना हे सारं सांगावं वाटणं यामागे नक्कीच राजकारण असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. सोशल मीडियात स्वराज्यरक्षक मालिकेतील संभाजी महाराज आणि छावा चित्रपटातील संभाजी महाराज यांची तुलना होतेय. मालिका आणि चित्रपटात दाखवलेल्या इतिहासावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होतेय.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

