Devendra Fadnavis | OBC आरक्षणाच्या प्रश्नावर आपण एकत्रित काम करु, राजकारण नको : देवेंद्र फडणवीस

“राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाप्रश्नी मला भेटले. मी त्यांना पुढाकार घेण्यास सांगितलं, आवश्यक ती सर्व मदत करेनच, शिवाय मी पर्सनली नोट तयार करुन देईन “, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाप्रश्नी मला भेटले. मी त्यांना पुढाकार घेण्यास सांगितलं, आवश्यक ती सर्व मदत करेनच, शिवाय मी पर्सनली नोट तयार करुन देईन “, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, इम्पिरिकल डाटाबाबत केंद्राकडे पाठपुराव करण्यासाठी चर्चा केली. (Chhagan Bhujbal OBC reservation Devendra Fadnavis)