Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…

Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…

| Updated on: Oct 23, 2026 | 1:21 PM

छगन भुजबळ यांनी एका कथित ५०० कोटी ऑडिओ क्लिपच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खासगी संभाषणांवर आधारित आणि दोन वर्षांनी समोर आलेल्या अशा क्लिपच्या आधारे चौकशी करणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या बदलत्या लक्ष्यांवर आणि राजकारण्यांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांवरही प्रकाश टाकला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एका कथित ५०० कोटी ऑडिओ क्लिपच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चौकशीच्या मागणीवर बोलताना भुजबळ म्हणाले की, “या आकड्यावर कोणी विश्वास ठेवणे शक्य नाही. दोन-चार लोकांमध्ये झालेल्या खासगी गप्पांची कोणीतरी रेकॉर्डिंग केली आणि त्याची चौकशी करावी, हे योग्य नाही.” ते पुढे म्हणाले की, “५०-१५ कोटी म्हटले असते, तर चौकशीचा विषय झाला असता; पण ५०० कोटींच्या आकड्यावर विश्वास बसत नाही.”

या संदर्भात राज ठाकरे यांनी आकडा महत्त्वाचा नाही, तर चर्चा व नरेटिव्ह धोकादायक आहे, असे म्हटले होते. यावर भुजबळ यांनी प्रतिप्रश्न केला की, “हे जर नरेटिव्ह होते, तर ते वर्तमानपत्रात का आले नाही? मीडियासमोर का आले नाही? हे आपसातले बोलणे होते, त्यात कसले नरेटिव्ह होणार?” ते म्हणाले की, दोन वर्षांनंतर ही क्लिप समोर आल्याने तिच्या हेतूंबाबत शंका निर्माण होते. तसेच, भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही भाष्य करत म्हटले की, त्यांचे टार्गेट वारंवार बदलत असते; कधी तुम्ही, कधी फडणवीस, कधी विखे, तर आता शिंदे.

 

Published on: Oct 23, 2026 1:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us