Chhagan Bhujbal | पैशांची कमतरता असताना देखील राज्य सरकार मजबुतीनं काम करतंय : छगन भुजबळ

सोनिया गांधी, शरदचंद्र पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत आहे. हे सरकार आपले पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुन्हा एकदा येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नाशिकः महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे झाली, पण अनेकांना डायजेस्ट होत नाही, असा शेलका टोला मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी विरोधकांना लगावला. निमित्त होते समता पुरस्कार वितरण सोहळ्याचे. भुजबळ म्हणाले, छत्तीसगढमध्ये भूपेश बघेल यांच्या रूपाने बहुजन समाजातील नेतृत्व मुख्यमंत्री पदावर काम करत आहे. त्यामुळे गोर गरिबांचे कामे होत आहेत. लोकांसाठी जे लढतात ते चिरकाल स्मरणात राहतात. त्यामुळे तुमचे नेतृत्व तुम्हीच निर्माण करा, असे ते म्हणाले. सोबतच महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाले आहे. मात्र, काही लोकांना अद्यापही ती ‘डायजेस्ट’ होत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. सोनिया गांधी, शरदचंद्र पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत आहे. हे सरकार आपले पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुन्हा एकदा येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI