Chhatrapati Sambhaji Raje on Mete | मेटेंच्या अपघाताला केंद्र आणि राज्य जबाबदार, छत्रपती संभाजीराजे यांची हलगर्जीपणावर टीका

Chhatrapati Sambhaji Raje on Mete | शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजे यांनी यंत्रणांच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली.

कल्याण माणिकराव देशमुख

|

Aug 14, 2022 | 4:15 PM

Chhatrapati Sambhaji Raje on Mete | शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायकराव मेटे (Vinayakrao Mete) यांच्या अपघाती मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी यंत्रणांच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली. त्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना तब्बल 1 तास आपत्कालीन व्यवस्थेतंर्गत मदत मिळाली नाही. रस्ते अपघातात हा गोल्डन अवर (Golden Hour) पार महत्वाचा मानल्या जातो. त्याकाळात वेळेत उपचार मिळाला तर व्यक्तीचे प्राण वाचविता येतात. पण मेटे यांच्या अपघातानंतर एक तास त्यांना मदत न मिळाल्याने छत्रपती संभाजी राजे यांनी संताप व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकार त्यासाठी जबाबदार असल्याची टीका ही त्यांनी केली. मराठा चळवळीचा एक मोठा नेता गमवाल्याचे दुःख आहेच. मुंबई-पुणे हा रस्ते वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक महामार्ग मानण्यात येतो. अशाठिकाणी आपत्कालीन व्यवस्था त्वरीत मिळणे आवश्यक असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें