सुरत आणि गुवाहाटी ऐवजी अयोध्येला का गेला नाही? शिंदेंना राऊतांचा प्रश्न
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली आहे. त्यांनी शिंदे यांच्यावर निशाना साधताना, आम्ही सातत्यानं मंदिरासाठी संघर्ष केला. त्यामुळे आम्ही सातत्यानं तेथे जातो. पण रामाचं जे सत्य वचन आहे ते तुम्ही कोठून घेणार असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री मंडळातील मंत्री आमदार आणि खासदार आज अयोध्येत आहेत. ते रामाच्या दर्शनाला गेले आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली आहे. त्यांनी शिंदे यांच्यावर निशाना साधताना, आम्ही सातत्यानं मंदिरासाठी संघर्ष केला. त्यामुळे आम्ही सातत्यानं तेथे जातो. पण रामाचं जे सत्य वचन आहे ते तुम्ही कोठून घेणार? पक्ष फोडून सुरत आणि गुवाहाटीला गेलात. तेव्हाच अयोध्येला कौल लावण्यासाठी का गेला नाहीत. तुम्हाला रामाची आठवण आताच कशी झाली, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तर त्याचवेळी रामाकडं आशीर्वाद मागितला असता तर प्रभु श्रीरामानं असत्याच्या बाजूनं कौल दिला नसता असेही राऊत म्हणाले.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी

