AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपने बनावट हिंदू ह्रदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न – Uddhav Thackeray

| Updated on: Apr 10, 2022 | 8:21 PM
Share

हिंदुत्वाचाच मुद्दा उचलून धरत, राज ठाकरे यांनी मशीदीतून भोंग्यांवर नमाज पठण करायचे असेल तर मंदिरातूनही हनुमान चालीसा भोंग्यांवर लावण्यात यावे, असे आवाहन केले होते. भाजपनेही या मुद्द्याला चांगलीच हवा दिली.

कोल्हापूर | देशात भाजपाने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फसला, लोकांनी झिडकरला. हिंदू हृदयसम्राट म्हणल्यावर नाव आणि चेहरा एकच येतो, तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)… त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते होऊ शकत नाहीत. हिंदू अडचणीत असताना घरी बसणारे आणि नंतर त्यावर प्रतिक्रिया देणारे हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात, पण हिंदुसम्राट होऊ शकत नाहीत, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून हिंदुत्वाचे मुद्दे बाजूला पडत आहेत, अशी टीका सातत्याने केली जात आहे. तसेच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीदेखील हिंदुहृदय सम्राट या नावाने पोस्टरबाजी केली होती. हिंदुत्वाचाच मुद्दा उचलून धरत, राज ठाकरे यांनी मशीदीतून भोंग्यांवर नमाज पठण करायचे असेल तर मंदिरातूनही हनुमान चालीसा भोंग्यांवर लावण्यात यावे, असे आवाहन केले होते. भाजपनेही या मुद्द्याला चांगलीच हवा दिली. या सर्व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता, भाजपाने उभा केलेला बनावट हिंदुहृदय सम्राट लोकांनी झिडकारयलाय, असं स्पष्ट शब्दात सांगितलं.