Paithan : पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा, जागोजागी बॅनरबाजी
संदीपान भुमरे हे बंडापासून चर्चेत राहिले आहेत. तर त्यांच्या मतदार संघात शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांचा दौरा झाल्यानंतर आता मुख्यमंत्री येत असल्याने ही सभा भुमरेंची ताकद दाखवून देण्यासाठी महत्वाची मानली जात आहे. ऐतिहासिक सभा असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे.
औरंगाबाद : (Sandipan Bhumare) मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदार संघात अर्थात (Paithan) पैठणमध्ये सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी पैसे देऊन नागरिक बोलावले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे (Ambadas Danve) आंबादास दानवे यांनी केला होता. त्यामुळे ही सभा चर्चेत आली आहे. असे असताना सभा यशस्वी करुन देण्यासाठी भुमरे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पैठण शहरात बॅनरबाजी करुन वातावरण निर्मित केली जात आहे. संदीपान भुमरे हे बंडापासून चर्चेत राहिले आहेत. तर त्यांच्या मतदार संघात शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांचा दौरा झाल्यानंतर आता मुख्यमंत्री येत असल्याने ही सभा भुमरेंची ताकद दाखवून देण्यासाठी महत्वाची मानली जात आहे. ऐतिहासिक सभा असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
