Pune : ‘ती दोन बाळं उद्या ‘दीनानाथ’च्या दारात उभी राहिली अन्..’, पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी चित्रसेन खिलारेंना अश्रू अनावर
खिलारे कुटुंबाची जागा दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशनला दिली हा विषय महत्त्वाचा नाही. मात्र तिथे जे घडलं ती घटना दुर्दैवी आहे असं चित्रसेन खिलारे म्हणाले यावेळी त्यांना भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या चांगलंच चर्चेत आहे. तनिषा भिसे नावाच्या गर्भवती महिलेचा या रूग्णालयाच्या मुजोरीमुळे जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जात आहे. गर्भवती महिलेच्या प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी कुटुंबीयांकडे १० लाख रूपयांच्या डिपॉझिटची मागणी करण्यात आली मात्र ही रक्कम वेळेत न भरल्याने साडेपाच तास गर्भवती महिला उपचाराविना राहिली. यादरम्यान, त्यांना दोन रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर त्यांनी दोन बाळांना जन्म दिला. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात एकच संपात व्यक्त करण्यात येत आहे. अशातच दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशनला ही जागा खिलारे कुटुंबाने दिली होती. भाऊसाहेब खिलारेंचे वारस चित्रसेन खिलारे यांनी या घटनेवर भाष्य केलं आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेच्या अहवाल समोर आल्यानंतर त्यसंदर्भात बोलताना चित्रसेन खिलारे हे भावनिक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

