CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष

CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष

| Updated on: Oct 16, 2026 | 9:18 AM

दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली निघणार आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ ही रॅली कॅनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क परिसरात आयोजित केली आहे. रॅलीपूर्वी अभिजीत दीपके यांनी अटकेची शक्यता व्यक्त केली असून, दिल्ली पोलीस खबरदारी घेत आहेत. सुप्रीम कोर्टाने आंदोलनावर निर्बंध लावण्यास नकार दिला आहे.

आज दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) लहरा दो तिरंगा रॅली काढणार आहे. कॅनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क परिसरात या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सीजेपीचे प्रमुख सदस्य सौरव दास आणि आशुतोष रांका यांना नुकतीच अटक करण्यात आली असून, त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. रॅलीच्या आयोजनापूर्वी सीजेपीचे अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलीस आपल्याला अटक करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी जंतर-मंतर येथे तिरंगा फडकवल्याबद्दल दास आणि रांका यांना ब्रीच ऑफ व्हायोलेशनच्या आरोपाखाली अटक करून पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ते सध्या तिहार जेलमध्ये आहेत. आजच्या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांच्या हातात तिरंगा असेल. दिल्ली महानगरपालिकेने सेंट्रल पार्क पुढील दोन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. सुप्रीम कोर्टाने आंदोलनावर कोणतेही निर्बंध लादण्यास नकार दिला असला तरी, दिल्ली पोलीस शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त करत आहेत. कॅनॉट प्लेस हा संसद भवनाच्या जवळ असल्यामुळे हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. आजची रॅली नियोजित वेळेनुसार पार पडते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

Published on: Oct 16, 2026 9:18 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us