Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis Video :  'जलयुक्त शिवार-२' ला आणि नदीजोड प्रकल्पाला मान्यता, राज्यातील मुख्यमंत्र्यांची बळीराजासाठी मोठी घोषणा

Devendra Fadnavis Video : ‘जलयुक्त शिवार-२’ ला आणि नदीजोड प्रकल्पाला मान्यता, राज्यातील मुख्यमंत्र्यांची बळीराजासाठी मोठी घोषणा

| Updated on: Mar 08, 2025 | 11:16 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दुष्काळापासून ते नदीजोड प्रकल्पापर्यंत शेतकऱ्यांच्या मोफत वीज पासून ते स्मार्ट मीटर पर्यंत अनेक विकासाच्या मुद्द्यांवर भाष्य केला आहे. गेल्या दहा वर्षातील गुंतवणूक अवघ्या नऊ महिन्यात मिळाल्याची माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे.

राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद वार्ता दिली आहे. गेल्या दहा वर्षातील गुंतवणूक अवघ्या नऊ महिन्यात मिळाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विधानसभेत बोलताना नदीजोड प्रकल्प, दुष्काळ, कोयनेच पाणी ते शेतकऱ्यांना मोफत वीज या मुद्द्यावर फडणवीसांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतल्याचं फडणवीसांनी म्हंटलं आहे. तर मराठवाड्याला पाणी वळवण्यासाठी निविदा काढल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

फडणवीसांच्या महत्त्वाच्या घोषणा

१. मराठवाडा, महाराष्ट्रातील इतर भागातील दुष्काळ दूर करण्यासाठी काम सुरू.
२. कोयनातून वाहून जाणार पाणी कोकणात वापरण्यासाठी अभ्यास सुरू.
३. जलयुक्त शिवार-२ ला मान्यता तसेच नदीजोड प्रकल्पाला मान्यता दिली.
४. सिंचनाच्या १६० प्रकल्पांना मान्यता दिली
५. ५४ टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी प्रकल्प अहवाल
६. २१ नवी धरण बांधणार आणि सहा धरणांची उंची वाढवणार तसेच ४२६ किलोमीटरचे कालवे मंजूर.
७. सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र देशात अव्वल तसेच खरेदीची मुदत तिसऱ्यांदा वाढवण्याचा प्रस्ताव दिला.
८. ५६२ केंद्रांवर ११ लाख २१ हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदी.
९. हमीभावान तुरी खरेदी, ७ हजार ५५० रुपये हमीभाव दिला

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला जाईल आणि मराठवाड्याला पाणी वळवण्यासाठी निविदा काढली जाईल, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

Published on: Mar 08, 2025 11:13 AM