Devendra Fadnavis : शिंदेंचं जय गुजरात, मनसेकडून मारहाण अन् भाषेचा वाद; फडणवीस सगळ्यांवर स्पष्टच बोलले…
पुण्यात जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पुण्यात पार पाडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात असं म्हटलं आणि विरोधकांनी निशाणा साधला. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीये.
‘शरद पवार यांनी चिकोडी येथे बोलताना जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक असं म्हटलं होतं. याचा अर्थ त्यांचं कर्नाटकवर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं समजायचं का? असा सवाल करत एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरातचा नाऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीये. आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो, त्या संदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं, म्हणजे एकनाथ शिंदे यांचं गुजरातवर प्रेम वाढलं आणि मराठीवरचं प्रेम कमी झालं, महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं, इतका संकुचित विचार मराठी मणसाला शोभत नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुढे ते असंही म्हणाले की, मराठी माणूस हा वैश्विक आहे. याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेला आहे. याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलंय. याच मराठी माणसानं मोगली सत्ता घालवण्याचं काम अन् दिल्लीवर भगवा फडकवण्याचं काम मराठी माणसानं केलंय त्यामुळे इतका संकुचीत विचार कोणी करत असेल तर ते चुकीचं असल्याचे स्पष्टपणे फडणवीसांनी म्हटलंय.

निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..

भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा

राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?

मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले
