Devendra Fadnavis : मोठे नेते…फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पावारांचे मानले आभार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. पवार यांनी फडणवीस यांचे कौतुक केले असून, त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणातील सौजन्यपूर्ण संबंधांचे दर्शन घडले आहे. पवार आणि ठाकरे यांनीही फडणवीसांच्या कार्याची दखल घेतली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस राज्यभरात साजरा केला जात आहे. त्यांना सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील सर्वच राजकीय नेते मंडळींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे आभार मानले आहेत. पवार मोठे नेते आहेत. त्यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल आभार… असे फडणवीसांनी म्हटले आहे. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केलेलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महाराष्ट्र नायक’ पुस्तकात उद्धव ठाकरे यांनी एक लेख लिहिला असून त्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधाळल्याचे पाहायला मिळाले. ‘फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि प्रशासकीय कौशल्य पक्षाला उपयुक्त ठरेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हणत देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

